AmbikaBai RajeMahadik

AmbikaBai RajeMahadik - अंबिकाबाई राजेमहाडीक


***********************************************************************************

AmbikaBai RajeMahadik - अंबिकाबाई राजेमहाडीक


***********************************************************************************

Ambikabai Mahadik
Birthdate: 1655
Death:
Immediate Family:
Daughter of Chhatrapati Shivaji and Maharani Saibai
Wife of Harji Raje Mahadik
Sister of Sambhaji Bhosale; Sakhubai, and Ranubai Jadhav
Half sister of Sakvarbai; Rajaram Raje Bhosale and Balibai,

Ambikabai Mahadik, born 1655
Ambikabai Mahadik was born in 1655, to Shivaji, Raje Bhosle and Maharani Saibai Shivaji.
Ambikabai had 3 siblings: Sambhaji Bhosale Bhosle and 2 other siblings.
Ambikabai married Harji Raje Mahadik.


अंबिकाबाई – सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या अंबिकाबाई यांचा विवाह तारळे (सातारा) येथील हरजीराजे महाडिक यांच्यासोबत झाला.



हरजी महाडीक हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. जी मोहीम शिवाजी महाराज त्यांना सोपवायचे ती मोहीम ते यशस्वी करूनच यायचे. हरजी यांची स्वराज्य निष्ठा आणि पराक्रम बघून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेजुरी गडावर हरजी यांना सोन्याचे कडे देऊन राजे या किताबाने सन्मानित केले. त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच शिवरायांनी अंबिकाराणी या त्यांच्या राजकन्येचा हात हरजीराजे यांच्या हातात कृतार्थ विश्वासाने दिला. १६६८ ला हा विवाह संपन्न झाला.


छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिष्ठ जावई व छत्रपती संभाजीराजे यांचे कर्तृत्ववान मेहूणे असलेल्या या शूर योद्ध्याने स्वतःचे प्राण तळहातावर घेऊन स्वराज्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते.


हरजीराजे यांनी शिवाजीराजे यांच्याप्रमाणे संभाजीराजेंना सुद्धा इमाने-इतबारे साथ दिली.


हरजीराजेंना सात मुले होती ती देशाच्या विविध प्रांतात स्थायीक झाली. हरजीराजे यांचे थेट वारस सध्या प्रामुख्याने देशभरात ग्वाल्लेर, सातारा, सांगली, कोल्हापूर, महाड, पुणे, नागपूर, श्रीरामपूर इत्यादी भागात बहुतांशी विखुरला गेला. साताऱ्याहून ३३ किलोमीटर अंतरावर महाडीक इनाम वतन असलेले तारळे (ता.पाटण जि. सातारा) गावी महाडिक घराण्याचा सगळा कारभार चालायचा. गावामध्ये ८ वाडे अजूनही शाबूत आहेत, त्यापैकी ३ ते ४ वाड्यांमध्ये त्यांचे वंशज राहतात, वाड्यांचे बांधकाम हे चुण्या मद्धे केलेले असून कौलारी वाडे आहेत, प्रत्येक वाड्यामध्ये वृंदावन, प्रशस्त बैठकीची जागा आहे, यातील काही वाड्यांमध्ये आजही सुस्थितीतील जुन्या काळातील भांडी, कपाटे, शास्त्रास्त्रे (तलवार, दांडपट्टा, खंजीर) पाहायला मिळतात. जुन्या काळात राजघराण्यातील स्त्रीयानां नेण्या आणण्यासाठीची पालखी, पेठारे आजही तिथे पाहायला मिळतात. वाद्यांच्या बाजूला जुने राममंदिर व मंदिरालगत जुन्या काळातील विहीर आहे. जुने पडझड झालेले वाडे, इतरत्र पडलेले शिल्पे, वीरगळी गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतात.


महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष-



संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते.


छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता चौथीपासुन शिकत आलो आहोत. परंतु आजही अनेक शिवप्रेमींना महाराजांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. त्या सर्वांसाठी महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे.



स्वराज्यनिर्मिती कार्यात महाराष्ट्रातील वजनदार सरदारांची आपल्याला गरज भासणार आहे हे शहाजीराजे आणि आऊसाहेब जिजाऊ यांनी ओळखलं होतं. त्या मातब्बर सरदारांशी नाते जोडुनच त्यांना एकत्र आणता येईल या उद्देशाने त्यांनी शिवरायांचे आठ वेगवेगळ्या सरदारांच्या मुलींसोबत विवाह लावुन दिले. शहाजीराजे-जिजाऊंचा उद्देश सफल झाला आणि हे सरदार स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात सहभागी झाले. शिवरायांच्या या आठ पत्नी कोणत्या, त्यांच्यापासुन शिवरायांना झालेल्या मुले-मुली कोण हे जाणुन घेऊया…



सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकर घराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.



***********************************************************************************



महाराजांच्या धर्मपत्नी-


१. सई बाई (निंबाळकर)

२. सोयराबाई (मोहिते)

३. पुतळाबाई (पालकर)

४. लक्ष्मीबाई (विचारे)

५. काशीबाई (जाधव)

६. सगुणाबाई (शिर्के)

७. गुनवातीबाई (इंगळे)

८. सकवारबाई (गायकवाड)



***********************************************************************************

महाराजांची मुले -

१. संभाजी

२. राजाराम



***********************************************************************************


महाराजांच्या मुली -

१. अंबिकाबाई महाडिक

२. सखुबाई निंबाळकर

३. राणूबाई जाधव

४. दिपाबाई

५. राजकुंवरबाई शिर्के

६. कमलबाई पालकर


***********************************************************************************


Join Us :-

https://rajemahadik.blogspot.com/
https://t.me/RajeMahadik
https://t.me/RajeMahadikGroup



RajeMahadik YouTube Channel


Tags:- #राजे #राजेमहाडीक #महाडीक #हरजीराजे #हरजी #हरजीराजेमहाडीक #महाडीकसरदार #सरदार #सरसेनापती #मराठा #मराठासरदार #सरनोबत #महाडीकघराणे #स्वराज्य #छत्रपती #शिवाजी #महाराज #संभाजी #महाराज #अंबिकाबाई #भवानीबाई #शाहूमहाराज #राजाराम #महाराज #मराठे #शूरमराठे #मराठावीर #मावळे #मावळा #दुर्ग #किल्ले #सुराज्य #महाराष्ट्र #भारत #अंबिकाबाईमहाडीक #भवानीबाईमहाडीक #महाडिक #मराठी #शिवप्रेमी #तलवार #ढाल #लढाई #युद्ध #गनिमीकावा #गनिमी #कावा #पराक्रम #इतिहास #पूर्वज #महाडीकवाडा #वाडा #युद्धकला #शौर्य #मराठाइतिहास #इतिहासकार #हिंदू #हिंदुस्थान #प्रजा #राज्य #राजा #राणी #राजकुमार #राजकुमारी #श्रीमंत #छावा #raje #rajemahadik #mahadik #harjiraje #harji #harjirajemahadik #mahadiksardar #sardar #sarsenapati #maratha #marathasardar #sarnobat #mahadikfamily #rajemahadikfamily #swarajya #surajya #chhatrapati #shivaji #maharaj #sambhaji #maharaj #ambikabai #bhavanibai #shahumaharaj #rajaram #marathe #shurmarathe #marathaveer #mavale #mavala #durg #kille #maharashtra #india #bharat #ambikabaimahadik #bhavanibaimahadik #marathi #shivpremi #talewar #dhaal #ladhai #yuddh #ganimikava #bravery #history #marathahistory #ancestors #mahadikbada #shaurya #hindu #hindustan #peoples #king #queen #prince #princess #royal #royalfamily #shrimant

1 comment: